विजेंदर पदक मिळविणार? - Marathi News 24taas.com

विजेंदर पदक मिळविणार?

www.24taas.com, लंडन
 
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक पटकावणार्‍या हिंदुस्थानच्या विजेंदर सिंगने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पुरुषांच्या ७५ किलो मिडलवेट प्रकारात अमेरिकेच्या टेरेल गॉशावर १६-१५ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता विजेंदर पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. बॉक्ंिसग या खेळामध्ये उपांत्य फेरीत धडक मारल्यास त्या खेळाडूचे पदक निश्‍चित होते.
 
या लढतीत गॉशाने दमदार सुरुवात केली, पण पहिल्या राऊंडमध्ये विजेंदरची कल्पक योजना फळाला लागली. विजेंदरने रिंगणाच्या मध्यभागी उभे राहून प्रतिस्पर्ध्याला आपल्या जाळ्यात अडकविले. त्याला आपल्याकडे आकर्षित करताना गुणही कमविले. यामुळे पहिल्या राऊंडमध्ये विजेंदरकडे ४-३ अशी आघाडी होती. दुसर्‍या राऊंडमध्ये उभय खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. गॉशाने दमदार राईट हुक मारत विजेंदरवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, पण विजेंदरचा बचावही भक्कम होता.
 
त्यामुळे या राऊंडमध्ये उभय खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी झाली. तिसर्‍या आणि अंतिम राऊंडमध्ये पुन्हा अटीतटीचा सामना झाला. लढत संपायला काही सेकंद बाकी असताना विजेंदरने मारलेला सॉल्लिड पंच गॉशाला महागात पडला. या राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये ७-७ अशी बरोबरी झाली, पण अखेरीस पाच रेफ्रींनी मिळून विजेंदरला सॉलिटरी गुणाच्या जोरावर विजयी घोषित केले.
 
 
 

First Published: Sunday, August 5, 2012, 13:34


comments powered by Disqus