'फुल'राणी सायनाचं स्वागत फुलांचा बुके फेकून - Marathi News 24taas.com

'फुल'राणी सायनाचं स्वागत फुलांचा बुके फेकून

www.24taas.com, नवी दिल्ली
 
लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आज दिल्लीत परतलेली फुलराणी सायना नेहवाल हीच्यावर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: फुलं फेकून मारली. सायना नेहवालवर बुके फेकण्यात आला जो तिचा कानाला लागला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्यं पदक पटकावून इतिहास रचणाऱ्या बॅडमिटंनपटू सायनाचं अशा वेगळ्या प्रकारे स्वागत करण्यात आलं.
 
दिल्ली एअरपोर्टवर सायनाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र काही असेही लोक होते ज्यांनी सायनाला त्रास दिला. आणि त्यांनी सायनावर निशाणा साधून फुलांचा बुके फेकून मारला.
 
एअरपोर्टवर सायनाच्या फॅन्सची खूपच गर्दी झाली होती. प्रेक्षकात हुल्लडबाजी करणाऱ्यातील एकाने सायनाच्या कानावर फुलांचा बुके मारला. अचानक बुकेचा मारा झाल्याने सायना प्रचंड घाबरली. मात्र सुरक्षारक्षकांनी लगेचच तिला सुरक्षितपणे बाहेर काढलं.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, August 7, 2012, 13:06


comments powered by Disqus