Last Updated: Thursday, August 9, 2012, 22:03
www.24taas.com, लंडन 
लंडन ऑलिम्पिकमधील भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही संपुष्टात आलेलं आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावं लागल्याने त्याचे आव्हानही संपुष्टात आले. आयर्लंडच्या पॅडी बार्नेसनं देवेंद्रोचा २३-१८ असा पराभव केला.
ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या ४९ किलो गटातही लढत खेळवल्या गेली. देवेद्रो सिंग लैर्शामकडून पदकाची आशा होती. या वेळी त्याने सुरेख पंच मारून विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, पॅडीच्या आक्रमणासमोर त्याचा फार काळ निभाव लागला नाही.
तिसऱ्या राऊंडमध्ये आक्रमक झालेल्या देवेंद्रोनं बार्नेसवर चांगलाच हल्ला चढवला आणि आठ गुणांची कमाई केली. पण तोपर्यंत सामना देवेंद्रोच्या खिशातून निसटला होता. देवेंद्रोच्या पराभवानंतर बॉक्सिंगमधलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
First Published: Thursday, August 9, 2012, 22:03