Last Updated: Tuesday, December 20, 2011, 16:57
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली सुनील छेत्रीला एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना १७ मॅच मध्ये १३ गोल नोंदवण्याची कामगिरी करुन दाखवली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला खेळ करणाऱ्या छेत्रीने त्याच्या क्लबकडून म्हणजेच चिराग युनायडेड तर्फे खेळताना देखील १० मॅचमध्ये सात वेळा गोल केले. आय लिग कोच यांनी पाच खेळाडूंच्या अंतिम यादीतून छेत्रीची निवड या पुरस्कारासाठी केली.
भारतातर्फे खेळताना आंतरराष्ट्रीय सामन्यांमधली कामगिरी तसेच वर्तणुक हे निवडीसाठीचे निकष होते. छेत्रीने २०११ साली क्लबकडून खेळताना २० सामन्यांमध्य ११ गोल केले. छेत्रीला यंदा अर्जून पुरस्काराने तसरेच सॅफ चॅम्पियनशीपमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही गौरवण्यात आलं. छेत्रीला चांदीच्या सन्मानचिन्हासह दोन लाख रुपयांचे रोख पारितोषिकही देण्यात येणार आहे. ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनचे महासचिन कुशल दास यांनीही छेत्रीच्या कामगिरी विषयी गौरवोदगार काढले आहेत.
यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगलं गेलं तसेच प्रत्येक सामन्या गणिक माझ्या कामगिरीत सुधारणा होत असल्याची प्रतिक्रिया छेत्रीने व्यक्त केली आहे.
First Published: Tuesday, December 20, 2011, 16:57