Last Updated: Friday, December 30, 2011, 11:50
झी २४ तास वेब टीम, अकलूज महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठेच्या किताबा मुंबईच्या नरसिंग यादव याने पटकावलाय.
नरसिंगने उस्मानाबादच्या अतुल पाटील याला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. अकलूज इथं ५५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली.
महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठेच्या किताबासाठी उस्मानाबादचा अतुल पाटील आणि मुंबईचा नरसिंग यादव यांच्यामध्ये कुस्ती रंगली. अतुल पाटीलने मातील विभागात कोल्हापूरच्या संग्राम पाटील याला पराभूत करत बाजी मारली. तर गादी विभागात नरसिंगने साताऱ्याच्या प्रवीण शेळकेचा पराभव करत विजय मिळवला.
हा किताब पटकावणारा नरसिंग मुंबईचा पाचवा मल्ल ठरला. यापूर्वी दिनानाथ सिंह (१९६६), शिवाजी पाचपुते (१९७९), उदयराज यादव (१९९३), अमोल बुचडे (२00६) यांनी हा पराक्रम केला आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच नरसिंग अतुलला वरचढ ठरणार अशीच अपेक्षा होती. त्यातून होणार्या चुकांचा लाभ घेत गुणांनी कमाई करायची हे नरसिंगचे तंत्र दिसून आले. गादी विभागात मुंबई उपनगरने ४२ गुणांसह विजेतेपद पटकावले. या विभागात गोपाळ यादवने सुवर्णही घेतले.
मुंबईला पाचव्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा९६ किलो वजनगटात मुंबई उपनगरच्या गोपाळला सुवर्णपदकगादी विभागात मुंबईला उपनगरला सर्वसाधारण विजेतेपद
First Published: Friday, December 30, 2011, 11:50