मेसीची बलून डोर गगनभरारी!!! - Marathi News 24taas.com

मेसीची बलून डोर गगनभरारी!!!

www.24taas.com, झुरिच
 
अर्जेन्टीना आणि बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसीनं सलग तिसऱ्य़ांदा फिफाचा बलून डोर पुरस्कार पटकावण्य़ाची किमया केली. त्यानं रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियाने रोनाल्डो आणि बार्सिलोनाचाच झावी हर्नांडेझला मागे टाकलं. मेसीला सर्वाधिक 47.88 टक्के वोट्स मिळाले. कोचेस, कॅप्टन्स आणि मीडियाचे निवडक प्रतिनिंधी या पुरस्कारांसाठी वोट करतात.
 
मेसीनं हा पुरस्कार जिंकण्याची हॅट्ट्रिक साधली आहे. ब्राझिलचा फुटबॉल लिजेंड रोनाल्डोनं त्याला हा पुरस्कार दिला. फुटबॉलचे कोचेस, कॅप्टन्स आणि काही निवड मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याची निवड केली. लिओनेल मेसीला सर्वाधिक 47.88 टक्के वोट्स मिळाले. तर रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला 21.6 टक्के वोट्स मिळाले तो दुसऱ्या स्थानावर आला. तर बार्सिलोनाच्याच झावी हर्नांडेझला 9.23 टक्के वोट्स मिळाले. मेसीनं बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग, ला लीगा आणि क्लब वर्ल्ड कपचं अजिंक्यपद पटकावून दिलं.
 
मेसीच्या या असामान्य कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार तिसऱ्यांदा पटकावण्यात यश आलं. मेसी आणि मायकल प्लॅटिनी यांच्याव्यतिरीक्त हा पुरस्कार तीनवेळा कोणालाही जिंकता आलेला नाही. त्यांनी 80 च्या दशकात बलून डोर तीनदा जिंकण्याची किमया केली होती. दरम्यान, मेसीनं आपल्या यशाचं श्रेय बार्सिलोना टीम आणि या टीमधील सहका-यांना दिलं आहे. लिओनेल मेसीनं 2011 सीझन तर आपल्या गोल धडाक्यानं गाजवला. आता 2012 सीझनमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
 
 

First Published: Tuesday, January 10, 2012, 16:25


comments powered by Disqus