Last Updated: Wednesday, January 25, 2012, 19:50
www.24taas.com, मेलबर्न भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि रशियन खेळाडू एलेना वेस्नीना ही जोडी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्या आहेत.
आज झालेल्या उपांत्य सामन्यात स्वेतलाना कुझनेत्सोव्हा आणि व्हेरा ज्वोनारेवाच्या रशियन जोडीने सानिया आणि वेस्नीना या जोडीला ७-६ (७-४), २-६, ६-४ अशा पॉइंट्सने पराभूत केलं.
उपान्त्य सामन्यातील विजेती कुज्नेस्कोव्हा आणि ज्वोनारेव्हा या जोडीचा सामना इटलीच्या सारा इरानी, रोबर्टा व्हिंसी आणि चेक गणराज्याच्या आंद्रेया हलावाकोवा आणि ल्यूसी हरादेस्का यांच्या होणाऱअया सामन्यातील विजेत्या जोडीशी होणार आहे.
First Published: Wednesday, January 25, 2012, 19:50