Last Updated: Sunday, January 29, 2012, 12:07
www.24taas.com भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा जोडीदार रॅडिक स्टेपनिकने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये डबल्सच विजेतेपद पटकावलं आहे. पेस-स्टेपनिकने अव्वल सीडेड अमेरिकेच्या ब्रायन बंधूंना ७-६, ६-२ ने पराभूत केलं.
पेसच्या करियरमधील हे पहिलच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम ठरलं असून हे त्याचं सातवं डबल्स ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं आहे. तर त्याच्या करियरमधील हे १३ वं ग्रँडस्लॅम ठरलय. दरम्यान पेस आणि त्याची रशियन इलेना वेसनिना रविवारी मिक्स डबल्सच्या विजेतेपदासाठी कोर्टावर उतरणार आहेत.
त्यामुळे आता मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर पेस आपलं नाव कोरतो का हे लवकरच कळेल, तसं झाल्यास पेसचं दुहेरी मधलं ऑस्ट्रेलियन ओपनमधलं हे दुसरं विजेतपद ठरणार आहे.
First Published: Sunday, January 29, 2012, 12:07