Last Updated: Sunday, January 29, 2012, 23:41
www.24taas.com, मेलबर्न वर्ल्ड नंबर वन नोवाक ज्योकोविचनं राफेल नदालचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत आजच्या चित्तथरारक सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.
टेनिसमधील या आघाडीच्या दोन खेळांडूमधला हा सामना तब्बल ५ तास ५३ मिनिटं रंगला होता. अखेर ज्योकोविचनं ५-७, ६-४, ६-२, ६-७. ७-५ असा विजय मिळवला.
ज्योकोविचचं हे कारकीर्दीतलं पाचवं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. तसंच नदालवर त्यानं सलग सातवा विजय नोंदवलाय. गेल्या वर्षी त्यानं नदालला हरवूनच विम्बल्डन आणि यूएस ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. ज्योकोविचचं हे तिसरं ऑस्ट्रेलियन जेते पद आहे.
First Published: Sunday, January 29, 2012, 23:41