F1ची भरारी, भारताच्या 'ट्रॅक'वरी !!! - Marathi News 24taas.com

F1ची भरारी, भारताच्या 'ट्रॅक'वरी !!!

झी २४ तास वेब टीम, नोएडा
 
फॉर्म्युला वन म्हणजे वेगाचा उत्सव, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करण्याची सवय ज्यांना आहे अशा व्यक्तींमध्ये हा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या ड्रायव्हर्सना अनेकदा गंभीर दुखापतीही झाल्यात. मात्र तरीही या खेळाबद्दलची त्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आता भारतीय फॅन्सनाही  हा वेगाचा थरार प्रत्यक्ष अनुभता येणार आहे.
 

12 टीम आणि 24 साहसी ड्रायव्हर या रेसमध्ये सहभागी होणार आहेत. तर लाखो F1 फॅन्स हा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सज्ज झालेत. हा खेळ डोळ्यांना दिसत नाही फक्त जाणवतो. गाड्यांचा आवाज अनेकांच्या -हदयात धडकी भरवणारा असतो. जर तुम्हालाही या वेगाच्या वेड आहे. रेस ट्रॅकवर घौडदौर करणा-या कार पाहून तूम्ही रोमांचित होत असाल तर या स्पर्धेत आपल्यासाठी मोठी पर्वणीच आहे. कारण की यंदा F1 चॅम्पियन भारतात होणार आहे.
 
भारतामध्ये होणा-या फॉर्म्युला वन रेसवर अवघ्या एफवन जगताच लक्ष असणार आहे. ही रेस अनके कारणांसाठी खास मानली जाते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाच वर्ल्ड चॅम्पियन पहिल्यांदाच रेसमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे दोन भारतीय ड्रायव्हर पहिल्यांदाच एकत्र रेसमध्ये उतरणार आहे. इंडियन ग्राँप्रीमध्ये जे ड्रायव्हर्स सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते सातवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मायकल शुमाकरचे. रेस ट्रॅकवर कमबॅक केल्यानंतर शुमाकरला एकही रेस जिंकता आलेली नाही. मात्र त्याचे चाहते त्याला रेस जिंकतांना पाहण्यासाठी आतूर आहेत. शूमाकरबरोबरच सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन सेबेस्टियन व्हेटल बुद्धा सर्किटवर रेसमध्ये झळकतांना दिसणार आहे.
 
लुईस हॅमिल्टन आणि जेन्सन बटन यांचेही असंख्य चाहते भारतात आहेत. फेरारीला मागील तीन सीझनपासून एफवनमधील आपली सत्ता पुन्हा काबीज करता आलेली नाही. मात्र इंडियन ग्राँप्रीमध्ये चुरस वाढविण्यासाठी फेलिपे मासा आणि फर्नांडो ओलोन्सो कोणतीही कसर सोडणार नाहीत. दुसरीकडे विजय मल्ल्यांच्या फोर्स इंडियाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. तर भारती एफवन चाहत्यांच्या आशा या करुण चंडोक आणि नरेन कार्तिकेयनवर असणार आहेत.
 
लोटस आणि हिस्पानिया रेसिंगकडून हे दोन्ही ड्रायव्हर्स सहभागी होणार आहे. आता या चॅम्पियन्सच्या मेळ्यामध्ये कोण बाजी मारते ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
 

First Published: Friday, October 28, 2011, 08:50


comments powered by Disqus