Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:17
झी २४ तास वेब टीम, मुंबई भारताला एशियन हॉकी चॅम्पियनशीप जेतेपद मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावणा-या मुबंईकर युवराज वाल्मिकीचं आज मुबंई एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.... नेहमीच उपेक्षित राहिलेल्या हॉकीला पुन्हा वैभव मिळवून देणा-या हॉकीपटूंच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली होती.. पण झी 24 तासने सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज मुबंई एअरपोर्टवर हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या स्वागतासाठी शेकडो क्रीडाप्रेमींनी आणि अनेक राजकीय पक्षांनी गर्दी केली होती. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना आतापर्यंतची वागणूक पाहता याहीवेळी एअरपोर्टवर थंडच स्वागच होईल असं युवराजला वाटत होतं पण आज एअरपोर्टवर ज्याप्रकारे युवराजचं स्वागत झालं, त्यामुळे युवराजही भारवून गेला. त्याचप्रमाणे भारतीय हॉकी टीमचा माजी कॅप्टन धनराज पिल्लेनं झी 24 तासमुळेच सरकारला युवराजची दखल घ्याला भाग पाडलं असल्याच स्पष्ट केलं.

हॉकीत एशियन चॅम्पियनशीप मिळवणा-या हॉकीपटूंना हॉकी इंडियानं काल प्रत्येकी केवळ 25 हजारांचं बक्षीस जाहीर करून बोळवण केली. परंतु खेळाडूंनी पुरस्कारांची रक्कम नाकारली. नवा कोच नवी टीम घेऊन उतरली आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारतीय टीम यशस्वीही झाली. हॉकी संघटनामध्ये वाद सुरू असतांनाच टीम इंडीयाला मिळालेलं हे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. मात्र हॉकीपटूंच्या या यशाचं कौतुक केवळ 25 हजार देऊन हॉकी इंडिया करत होती. मात्र हे बक्षीस हॉकीपटूंनी धूडकावून लावत हॉकी इंडियाची चांगलीच नाचक्की केली. भारतीय ़ टीमचा कॅप्टन राजपाल सिंगनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एरवी आयपीएल आणि क्रिकेटपटूंवर बक्षीसं आणि सवलतींची खैरात करणारं महाराष्ट्र सरकार एका झोपडीत राहून मोठी मजल मारणा-या आणि देशाचं नाव उंचावणा-या युवराजची दखल घ्यायला तयार नाही.. युवराजची उपेक्षा झी 24 तासनं सर्वप्रथम समोर आणली तेव्हा त्याच्या वाट्याला निदान मुबंईत जल्लोषी स्वागत तरी आलं.. तर केवळ 25 हजारांच्या बक्षीसावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरी भाषेत आसूड ओढलाय. भारतीय हॉकी टीमनं पाकिस्तानला हरवल्याचा विशेष आनंद झाला असल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं. युवराज मुबंईत येताच मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. यावेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कॅप्टन धनराज पिल्लेही युवराजसोबत होते. बाळासाहेबांनी यावेळी युवराजचे अभिनंदन केलं आणि शिवसेना हॉकीपटूंना मदत करणार असल्याची घोषणा केली.
First Published: Sunday, October 9, 2011, 14:17