सिरीयाच्या बॉडी बिल्डरचा मुंबईत अकस्मात मृत्यू - Marathi News 24taas.com

सिरीयाच्या बॉडी बिल्डरचा मुंबईत अकस्मात मृत्यू

Tag:  
झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत होणाऱ्या मिस्टर युनिवर्स या स्पर्धेला सुरवातीलाच गालबोट लागलं आहे. कारण की सिरीयाहून आलेला बॉडी बिल्डर मेहबूब अल हदिदी ह्या विदेशी खेळाडूचा गूढरित्या मृत्यू झाला आहे. मिस्टर युनिवर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या बॉडी बिल्डरचा अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.
 
सिरियाहून आलेला बॉडी बिल्डर  मेहबूब अल हदिदी  हा 28 वर्षीय मेहबूबची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला मालाडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला. डीहायड्रेशनमुळे मेहबूबचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . मुंबईतल्या या स्पर्धेसाठी विविध देशातले 400 स्पर्धक सहभागी झालेत. मात्र, बॉडी बिल्डरच्या या मृत्युमुळे खेळाडूंमध्ये चिंतेचं वातावरण होतं.
 
 

First Published: Saturday, November 5, 2011, 05:54


comments powered by Disqus