Last Updated: Friday, February 24, 2012, 22:06
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत आज ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अत्यंत चुरशीच्या शेवटच्या साखळी सामन्यात पोलंडला ४-२ असे नमवले. आता भारताचा मुकाबला अंतीम सामना फ्रान्सशी होणार आहे. भारताने सलग ५ सामने जिंकून १५ गुण प्राप्त केले आहे.
पोलंडने या सामन्यात भारतासमोर विजय किंवा बरोबरी मिळवली असती तर त्यांचा मुकाबला फ्रान्सशी अंतीम सामन्यात होणार होता. मात्र, सुरूवातीला मिळालेली दोन गोलची आघाडी पोलंडला कायम ठेवता आली नाही.
आता, भारताचा अंतीम सामना २६ फेब्रुवारी रोजी फ्रान्सशी होणार आहे. यापूर्वी फ्रान्सने १० अंक मिळवून फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. या पात्रता फेरीत अंतिम दोन संघामध्ये होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहे.
First Published: Friday, February 24, 2012, 22:06