फायनलचे 'स्वप्न आमुचे भंगले'......... - Marathi News 24taas.com

फायनलचे 'स्वप्न आमुचे भंगले'.........

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारतीय महिला हॉकी टीमने लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्याची संधी गमावली आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्वालिफाइंगच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकने भारतावर ३-१ ने विजय मिळवला. आणि भारतीय महिला हॉकी टीमचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न देखील भंगलं.
 
भारतीय महिला हॉकी टीमला अनेक वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली होती. मात्र भारतीय टीमला ह्या संधीच सोन करता आलं नाही. १९८० पासून भारतीय महिला हॉकी टीम एकदाही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेली नाही. भारतीय महिला हॉकी टीमने नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या लंडन ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये इटलीला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. भारताने इटलीला १-० ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
 
फायनलमध्ये भारतीय महिला हॉकी टीमने जर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल असतं तर भारतीय महिला हॉकी टीम लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होती. भारतीय हॉकी महिला टीम यापूर्वी १९८० च्या पूर्वी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. यानंतर भारतीय महिला हॉकी एकदाही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेली नाही. ही भारतीय महिला हॉकी टीमची शोकांतिका आहे.
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 21:45


comments powered by Disqus