Last Updated: Sunday, February 26, 2012, 22:35
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय हॉकी संघाने फ्रान्सवर ८-१ असा शानदार विजय मिळवत लंडन ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला आहे. संदीप सिंगने पाच गोल करत संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला. संदीप सिंगने आतापर्यंत एकूण १७ गोल करत सातत्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन केलं. भारतीय हॉकी संघाने आठ वर्षानंतर पात्रता फेरी पार करत ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला. सुनील, लाक्रा आणि रघुनाथ या तिघांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.
बीजिंग ऑलिंपिकसाठी भारत पात्रता फेरी पार करु शकला नव्हता.
मध्य प्रदेश सरकारने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केलं आहे.
First Published: Sunday, February 26, 2012, 22:35