महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवला मारहाण - Marathi News 24taas.com

महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवला मारहाण

www.24taas.com, नगर
 
कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट नरसिंग यादवला नगरमध्ये मारहाण झाली आहे. नगरमध्ये वाडिया पार्क मैदानात अतुल पाटील आणि नरसिंगमधील  लढत बरोबरीत सुटली. आणि दोघांना बक्षिसाची रक्कम अर्धी-अर्धी वाटून दिली. त्यानंतर नरसिंग आपल्या नरसिंग  क्रीडा संकुलात परत गेला. तेव्हा त्याला आणि कोचला जबर मारहाण करण्यात आली.
 
या साऱ्य़ा प्रकाराची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिकांच्या दबावामुळे त्याला तक्रार मागे घ्यावी लागली. दरम्यान झाल्याप्रकारमुळे नगरला कुस्ती खेळायला कधीही येणार नसल्याचा निर्णय नरसिंग यादवनं घेतला असल्याच समजतं आहे.
 
नरसिंग यादवनं अहमदनगरच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रारही नोंदवली. पण स्थानिकांनी फिर्याद मागं घेण्यासाठी त्याच्यावर दडपण आणल्याचं वृत्त आहे. तसंच चोरी झालेल्या रकमेपैकी केवळ पंचवीस हजार रुपयांचीच भरपाई करण्यात आल्याचं नरसिंगचं म्हणणं आहे.
 
 
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 12:29


comments powered by Disqus