Last Updated: Wednesday, March 7, 2012, 08:37
www.24taas.com, मुंबई सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी या तिघींचंही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.
याचबरोबर भारतीय महिला कबड्डी टीमचे कोच रमेश भेंडगिरी यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. सुवर्णा बारटक्के हिने सरकारी नोकरीसाठी असणाऱ्या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्यास तिला लगेच नोकरी देण्यात येईल असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान दीपिका जोसेफ हिला एशियन कप जिंकल्यानंतर सरकारने क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी दिलेली आहे तर अभिलाषा ही रेल्वेमध्ये नोकरीला आहे.
First Published: Wednesday, March 7, 2012, 08:37