सुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद - Marathi News 24taas.com

सुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद

www.24taas.com, मुंबई
 
 
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
 
 
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी या  महिला कबड्डीपटूंवर कौतुकाची थाप  मारली.  त्यांना अशीच उत्तुंग कामगिरी करण्याचा आशीर्वाद दिला. महाराष्ट्र राज्याची शान उंचावणा-या या कबड्डीपटूंवर राज्यसरकराने आपली तिरोजी उघडून त्यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव करावा, असं बाळासाहेबांनी यावेळी सरकारला ठणकावल.
 
 
तसंच या सुवर्णकन्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही कृष्णकुंजवर भेट घेतली. राज ठाकरे यांनीही यावेळी सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रेचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.  तसंच भविष्यातही त्यांच्याकडून अशाच विजयी कामगिरीची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. या सुवर्ण कन्यांचा सर्वत्र गौरव होत असल्याने दोघीही भारावून गेल्या होत्या.

First Published: Wednesday, March 7, 2012, 18:22


comments powered by Disqus