जोकोविची 'दिवाळी', १६ लाख बोनस! - Marathi News 24taas.com

जोकोविची 'दिवाळी', १६ लाख बोनस!

झी २४ तास वेब टीम, पॅरिस
 
वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉपवर असणारा सर्बियन प्लेअर नोवाक जोकोविचने पॅरिस मास्टर्सची तिसरी फेरी गाठून तब्बल १६ लाख डॉलर्सचा बोनस खिशात टाकला. दुखापतींमुळे टेनिस कोर्टपासून लांब राहणाऱ्या जोकोविचने जोरदार पुनरागमन केलं असून, एँडी मरे, रॉजर फेडरर आणि डेव्हिड फेररने आपापल्या लीग मॅचेस जिंकत तिसऱ्या फेरीत धडाक्यात प्रवेश केला.
 
पॅरिस मास्टर्स टेनिस टूर्नामेंटच्या थर्ड राऊंडमध्ये प्रवेश करताच वर्ल्ड चॅम्पियन टेनिस प्लेयर नोवाक जोकोविचला जागतिक टेनिस फेडरेशनकडून १६ लाख डॉलर्सचा बोनस मिळाला. एटीपी नियमांनूसार वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉपवर असणाऱ्या टेनिस प्लेयरने सर्व आठ मास्टर्स टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवल्यास त्याला २०लाख डॉलर्सचा बोनस मिळतो. मात्र एक मास्टर्स टूर्नामेंट न खेळल्यास मिळणारा बोनस कमी होतो.
 
दुखापतींमुळे शांघाय मास्टर्सला मुकावं लागलेल्या जोकोविचला १६ लाख डॉलर्सचा बोनस मिळाला. नुकत्याच खांद्याच्या दुखापतीतून सावरणाऱ्या जोकोविचला बसेल. येथे झालेल्या टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये जपानच्या केयी निशीकोरीकडून पराभव स्विकारावा लागला होता. जोकोविचने या संपुर्ण सीझनमध्ये तीन ग्रँण्ड स्लॅमसह पाच मास्टर्स टूर्नामेंट्सचं जेतेपद मिळवलं.

First Published: Thursday, November 10, 2011, 18:31


comments powered by Disqus