Last Updated: Saturday, November 12, 2011, 11:30
झी २४ तास वेब टीम, मुंबई टेनिस आयकॉन रॉजर फेडररने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोचा ६-३, ७-५ असा पराभव करत आपल्या कारकिर्दीतली ८०० वी मॅच जिंकली. आता पारिस मास्टरच्या सेमिफायनलमध्ये फेडरेरचा सामना तोमास बरडाईचशी होईल. टेनिसच्या इतिहासात ८०० सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा फेडरर हा सातवा खेळाडू आहे. फेडररने आतापर्यंत १६ ग्रँड स्लॅम टायटल्सवर आपलं नाव कोरलं आहे. फेडररने मागच्याच आठवड्यात बेसलमध्ये ६८ वी ट्रॉफी जिंकली. टेनिस रॅकिंगमध्ये ३४ व्या क्रमांकावर असलेल्या मोनाकोचा पराभव करताना टॉप २० रँकिंगच्या बाहेर असणाऱ्या खेळाडूं विरुध्द फेडररने ६२ मॅच जिंकल्या आहेत.
First Published: Saturday, November 12, 2011, 11:30