इस्रायल ‘मॅस्कॉट’शिवाय लंडन ऑलिंपिकमध्ये - Marathi News 24taas.com

इस्रायल ‘मॅस्कॉट’शिवाय लंडन ऑलिंपिकमध्ये

www.24taas.com, जेरुस्लेम
 
 
 
ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रत्येक संघाचा इस्रायल ‘मॅस्कॉट’  लंडन ऑलिंपिकमध्ये
ही वैशिष्ट्यपूर्ण बाब असते; पण या वर्षी होणाऱ्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत इस्राइलचा संघ मात्र कुठल्याही "मॅस्कॉट'शिवायच सहभागी होणार आहे. "मॅस्कॉट' कसा असावा, याविषयी समोर आलेल्या कल्पना दोनदा नाकारल्या गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
 
निळ्या रंगाच्या "डायपर'मध्ये असलेल्या एका लहान मुलाचे पात्र "मॅस्कॉट' म्हणून निवडण्यात आले होते. पण, हे पात्र "बॅम्बा' या इस्राइलमधील लहान मुलांमध्य लोकप्रिय असलेल्या खाद्यपदार्थाचे प्रतीक आहे. या प्रतीकाची "मॅस्कॉट' म्हणून निवड झाल्याने इस्राइलमध्ये नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. या खाद्यपदार्थाचे निर्माते "ओसेम' कंपनीने इस्राइलच्या ऑलिंपिक समितीला हा "मॅस्कॉट' वापरण्यासाठी एक लाख शेकेल्स (** डॉलर्स) निधी दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. ऑलिंपिकच्या "मॅस्कॉट'साठी प्रायोजकत्व स्वीकारणे, हा भ्रष्टाचार असल्याची टीका इस्राइलचे क्रीडा मंत्री लिमोर लिवनॅट यांनी केली.
 
इस्राइलचा "मॅस्कॉट' म्हणून सर्वांत आधी "श्‍पित्झिक'ची निवड करण्यात आली होती. "कॅक्‍टस'च्या आकाराच्या या पात्राची निवड इस्राइलच्या नागरिकांनी इंटरनेटवरील एका जनमत चाचणीतून केली होती. मात्र, "श्‍पित्झिक'चे लहान मुलांसाठी असलेल्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातील एका पात्राशी साधर्म्य असल्याने इस्राइलमधील न्यायालयाने "मॅस्कॉट' म्हणून "श्‍पित्झिक'ची निवड रद्द ठरविली होती. आता "मॅस्कॉट'साठी केलेली निवड दोन वेळा रद्द ठरविण्यात आल्याने, लंडन ऑलिंपिकमध्ये इस्राइलचा संघ "मॅस्कॉट'शिवायच सहभागी होईल.

First Published: Wednesday, June 20, 2012, 08:22


comments powered by Disqus