Last Updated: Monday, April 30, 2012, 16:50
www.24taas.com, लंडन 
शूटर्सचा लंडनमध्ये अपमान करण्यात आला. भारताचे शूटर्स लंडनमध्ये ऑलिंपिक टेस्ट इव्हेंटसाठी सहभागी झाले होते. मात्र या इव्हेंटनंतर भारतीय शूटर्सचा अनुभव अतिशय क्लेषदायक ठरला.
इव्हेंट झाल्यानंतर भारतीय शूटर्सना हॉटेल मालकाने हॉटेल बाहेर काढलं. त्यामुळे प्लेअर्सना रात्रभर हॉटेलच्या गॅलरीत बसावं लागलं. भारतीय शूटिंग टीममधले स्टार शूटर गगन नारंग, संजीव राजपूत, विजय कुमार, अनुराजसिंह, राही सरनौबत, जॉयदिप कर्मकार यांना अपमानित करण्यात आलं.
भारताच्या शूटर्सची लंडनमध्ये चीफ कोच सनी थॉमस यांनी एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. मात्र इव्हेंट झाल्यानंतर अचानक हॉटेल मालकानं शूटर्सना हॉटेलची रूम रिकामी करायला सांगितली. आणि त्यांना हॉटेलबाहेर काढण्यात आलं.
First Published: Monday, April 30, 2012, 16:50