कुस्तीपटू नरसिंगचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं - Marathi News 24taas.com

कुस्तीपटू नरसिंगचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

www.24taas.com, मुंबई
 
हेलसिंकी फिनलँड येथे लंडन ऑलिम्पिक क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये भारताच्या नरसिंग यादवने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणारा नरसिंग हा भारताचा पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.
 
नरसिंग ७४ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्रातून देशाचं ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग एकमेव कुस्तीपटू आहे. नरसिंग लंडन ऑलिम्पिककरता क्वालिफाय झाल्याने त्याचे कोच जगमल सिंग यांनाही खुप आनंद झाला आहे.
 
तसंच नरसिंगकडून त्याचे कोच असणाऱ्या जगमल यांनी मेडलची अपेक्षा व्यक्त केली असून, नरसिंग यशस्वी होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. तसचं सगळ्यांनाच त्याचाकडून मेडलची अपेक्षा असणार आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 16:45


comments powered by Disqus