Last Updated: Sunday, August 25, 2013, 15:31
www.24taas.com , झी मीडिया, ठाणे२४व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुरुषांमध्ये आलम सिंगनं १ तास, ७ मिनिटं आणि ३७ सेकंदांची वेळ नोंदवत २१ किलोमीटरमध्ये बाजी मारली. मात्र ही मॅरेथॉन खऱ्या अर्थानं रंगली ती रस्त्यावरील खड्ड्यांमुळं.
आलम सिंगनं प्रमाणंच अर्जुन प्रधाननं १ तास ७ मिनिटं आणि ४८ सेंकदांची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. आशिष सिंगनं १ तास ७ मिनिटं आणि ४९ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरं स्थान पटकावलं. आलम सिंग हा उत्तराखंडचा आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आलेला अर्जुन प्रधान देहराडूनचा आहे. या दोघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली.
कायमच अव्वल धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनकडे अव्वल धावपटूंनी मात्र पाठ फिरवली. ही मॅरेथॉन वेगवेगळ्या 9 गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. एकीकडे ठाणे महापौर मॅरेथॉनवर जवळपास पन्नास लाख रुपये खर्च केले गेले तर दुसरीकडे मात्र एवढा खर्च करूनही ज्या रस्तावरून खेळाडू धावणार होते.
त्यामुळं एकूणच ठाणे मॅरेथॉन धावपटूंसाठी चांगलीच आव्हानात्मक ठरली. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं धावपटूंना मॅरेथॉन पार करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, August 25, 2013, 15:31