Last Updated: Friday, September 27, 2013, 17:53
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक नाशिकच्या विदीत गुजराथीनं ‘वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’मध्ये ब्राँझ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलीय.
‘ज्युनियर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप’ जिंकणारा विदीत महाराष्ट्राचा पहिला बुद्धीबळपटू ठरला आहे. आठव्या सीडेड विदीतनं ९.५ पॉईंट्सह ब्राँझ मेडलवर आपलं नाव कोरलं. विदीत मुंबईच्या प्रवीण ठिपसे आणि पुण्याच्या अभिजित कुंटेनंतर महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर आहे.
विदीत ज्याला गुरु मानतो अशा गॅरी कास्पोरोव्हच्या हस्ते त्याला हे ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आलं.
दरम्यान, यापूर्वी पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन यानं याच टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडलची कमाई केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 27, 2013, 17:53