24taas.com, vijay kumar got promotion in army

रौप्यविजेत्या विजय कुमारला लष्करात बढती

रौप्यविजेत्या विजय कुमारला लष्करात बढती
www.24taas.com, नवी दिल्ली
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये नेमबाजीत रौप्यपदक पटकावणारा भारतीय लष्करातील सुभेदार विजय कुमार आता सुभेदार मेजर विजय कुमार झालाय.

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर विजय कुमारनं आपल्याला अजूनही लष्करात प्रमोशन मिळालं नसल्याची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. बढती मिळाली तरच लष्करात राहणार असल्याचंही त्यानं म्हटलं होतं. त्यानंतर लष्करानं याची दखल घेत ३० लाख रोख बक्षीसासहीत विजय कुमारला सुभेदार मेजरपदी बढतीही दिलीय. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सिंह यांच्या उपस्थितीत विजय कुमारला सुभेदार मेजरपदी नियुक्त केलं गेलं. विजय कुमारला अधिकारी पदाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंह यांनी आश्वासन दिलंय. पदक जिंकल्यानंतर लगेचच प्रमोशन देण्याचे लष्कराचं धोरण नाही. विजयला यापूर्वीच चांगल्या बढत्या मिळाल्याने तो सुभेदार बनला आहे. लष्करात २४-२६ वर्षे सेवा बजावल्यानंतर जवानाला सुभेदाराचं पद मिळतं, विजय कुमार केवळ ७-८ वर्षांतच वयाच्या २६ व्या वर्षीच हे पद मिळाल्याचं लष्कराचं म्हणणं आहे.

विजय कुमारसोबत देवेंद्रो सिंह आणि शिव थापा यांनाही एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय.

First Published: Friday, August 17, 2012, 10:39


comments powered by Disqus