Last Updated: Tuesday, April 16, 2013, 16:58
www.24taas.com, नवी दिल्ली ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.
'नॅशनल अॅन्टी डोपिंग एजन्सी'नं (नाडा) बॉक्सर विजेंदरचं यूरीन आणि ब्लड सॅम्पल घेतलं होतं. विजेंदरचा मित्र राम सिंह हादेखील या प्रकरणातला एक आरोपी आहे. विजेंदरवर हेरॉईन घेतल्याचा आरोप होता. पंजाब पोलिसांनी मोहालीतल्या जिरकपूरमधून अनुप सिंह काहलो याच्या घरावर छापा मारून २६ किलो हेरॉईन जप्त केलं होतं. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १३० करोड रुपये वर्तविली गेली होती.
यापूर्वी, पंजाब पोलिसांनी ‘डिसेंबर २०१२ पासून फेब्रुवारी २०१३ पर्यंत विजेंदरनं १२ वेळा आणि त्याचा सहकारी राम सिंह यानं ५ वेळा ड्रग्ज घेतल्याचं’ म्हटलं होतं. विजेंदर आणि राम सिंह यांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या तस्कर अनुप सिंह काहलो आणि रॉकी यांच्याकडून अंमली पदार्थ घेतल्याचं चौकशीत उघड झालंय, असं याआधी पोलिसांनी म्हटलं होतं.
First Published: Tuesday, April 16, 2013, 16:50