`शाहीन` उंट करणार फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी who will be winner of fifa

`शाहीन` उंट करणार फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी

`शाहीन` उंट करणार फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी
www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई

गेल्या वेळेच्या फुटबॉल वर्ल्डकपचं एक खास आकर्षण म्हणजे पॉल ऑक्टोपस. या ऑक्टोपसनं फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली होती. गेल्या वेळी असलेल्या पॉलची जागा यंदा उंटानं घेतलीय.

फिफा वर्ल्डकप 2014मध्ये `शाहीन` नावाचा उंट फुटबॉल वर्ल्डकपसाठी भविष्यवाणी करणार आहे. हा उंट डोळे मिचकावत कोणता संघ जिंकेल हे सांगणार. हा उंट संयुक्त अरब अमिरातमधील आहे आणि सध्या उंट दुबईमध्ये आहे.

यूएईचे वृत्तपत्र गल्फ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, गल्फ न्यूजच शाहीन उंटाची व्यवस्था करत आहे. गुरुवारपासून शाहीन नेहमी एका मॅचची भविष्यवाणी करेल. प्रश्न फक्त एवढाच आहे की पॉलसारखी शाहीन पण खरी-खरी भविष्यवाणी करेल का? यासाठी एका विशेष टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे.

सध्या हा उंट दुबई मधील रेगिस्तानमध्ये आहे आणि गल्फ न्यूजने वर्ल्डकपची भविष्यवाणी करण्यासाठी त्याची व्यवस्था केली आहे. गुरुवारी सकाळी शाहीन आपली पहिली भविष्यवाणी करेल. उद्या पहिली मॅच ही ब्राझिल आणि क्रोएशियामध्ये असणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 16:00


comments powered by Disqus