झी २४ तास `इम्पॅक्ट`: धावपटू अंजना ठमकेच्या घरी `नॅनो` Zee 24 Taas Impact- Player receives Nano

झी २४ तास `इम्पॅक्ट`: धावपटू अंजना ठमकेच्या घरी `नॅनो`

 झी २४ तास `इम्पॅक्ट`: धावपटू अंजना ठमकेच्या घरी `नॅनो`
www.24taas.com, नाशिक

नाशिकमधील धावपटू अंजना ठमके हिच्या घरी अखेर नॅनो आली आहे. उत्तर प्रदेशात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिला ही कार बक्षिसाच्या रुपात मिळाली होती.

मात्र इंधन आणि चालकासाठी पैसे नसल्यानं बक्षिस मिळालेली कार नाशिकमध्ये आणणं अंजनाला शक्य नव्हतं. अखेर कोच आणि एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहकार्यानं ही कार नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या कारमधून फिरुन अंजनाने या क्षणाचा आनंदही लुटला.



झी 24 तासनं या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. या प्रकरणाची जिल्ह्याधिका-यांनी गंभीर दखल घेत, खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. तसचं जिल्हाधिका-यांनी सर्व खेळाडूंचा घरी सत्कार केला आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:47


comments powered by Disqus