चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा दाखल , Jayant Pawar in Pune on Fir

चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा दाखल

चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा दाखल
www.24taas.com,पुणे

पुण्यातल्या चिल्लर पार्टी प्रकरणी हॉटेलचे मालक जयंत पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते बंधु आहेत.

हॉटेल रिव्हर व्हूमध्ये सुमारे सातशे अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला होता. या प्रकरणी काही चागरुक पालकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर `झी २४ तास`नं हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं. त्यावेळी पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता.

मात्र हॉटेलचे मालक जयंत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जयतं पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलतबंधू आहेत. त्यामुळंच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याची टीका होत होती. अखेर आज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चिल्लर पार्टी: जयंत पवारांवर गुन्हा दाखल


पुण्यातल्या वाघोलीत एका हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. रात्रभर धिंगाणा घालणा-या ३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. ज्या ठिकाणी पार्टी झाली तो माया क्लब पुणे एटीएसमधील एका अधिका-याच्या पत्नीच्या मालकीचा आहे.

गेल्या आठवड्यात दोन पार्ट्यांचा पर्दाफाश झाला असतानाच पुन्हा आणखी एका पार्टीचा पर्दाफाश झाला. ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली ते हॉटेल जयंत पवार यांच्या मालकीचे आहे.

First Published: Monday, September 3, 2012, 18:22


comments powered by Disqus