Last Updated: Friday, January 13, 2012, 17:10
www.24taas.com, पुणे पुण्यात मुंडे-गडकरी गटांतील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे आज विनोद तावडेंच्या सत्कार समारंभाला गोपीनाथ मुंडेंच्या गटांतील नेत्यांनी दांडी मारल्याचं चित्र पहायला मिळालं. यावरून भाजपात सारं काही आलबेल नसल्याचंच दिसत आहे.
आज पुण्यात विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला मुंडे गटातील माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहोळ, दिलीप कांबळे गैरहजर होते. तर गडकरी गटातील विकास मठकरी, गिरीश बापट, भीमराव तापकीर, गणेश बिडकर स्टेजवर होते. दोन्ही गटातल्या नेत्यांची दिलजमाई करण्याचे प्रयत्न पक्षात सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना काल मुंबईत बोलवण्यात आलं होतं.
मात्र तावडेंच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीनं वाद कायम असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या कार्यक्रमांमुळे या नेत्यांना हजर राहता आलं नाही अशी सारवासारव विनोद तावडेंनी केली आहे.
First Published: Friday, January 13, 2012, 17:10