हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला 'धक्का' ! - Marathi News 24taas.com

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला 'धक्का' !

www.24taas.com, पुणे
 
हर्षवर्धन पाटलांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना झटका दिला आहे. इंदापूरमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
 
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर तालुक्यात गळती लागली आहे. मुरलीधर निंबाळकर, तुकाराम काळे, पांडूरंग मारकर या प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तुकाराम काळे पंचायत समितीचे माजी सभापती होते. तर मुरलीधर निंबाळकर भू-विकास बँकेचे माजी अध्यक्ष होते.
 
नगरपरिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेवर निसटता विजय मिळवला. अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडून हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं आहे.
 

 
 

First Published: Saturday, January 14, 2012, 21:30


comments powered by Disqus