Last Updated: Thursday, January 19, 2012, 20:44
www.24taas.com, नवी दिल्ली 
तिहार तुरुंगातून पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींची आज जामीनावर सुटका झाली. तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर कलमाडी जेलबाहेर आले. मिडीयाला हुलकावणी देत ते मार्गस्थ झाले. राष्ट्रकुल घोटाळ्यात कलमाडींना जेलची हवा खावी लागली होती. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी पुण्यात परतणार असल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सुरेश कलमाडी यांची जामिनावर सुटका झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी गेले नऊ महिने अटकेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडींना जामीन मंजूर झाला. संध्याकाळी कलमाडी जेलमधून बाहेर पडले असून, उद्या ते पुण्यात पोहचण्याची शक्यता आहे. पाच लाखांच्या जातमुचलक्यावर दिल्ली हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
तिहार जेलमध्ये असलेल्या कलमाडींची आज किंवा उद्या सुटका होणार आहे. कलमाडींनी कोर्टाची परवानगी न घेता परदेशात जाऊ नये, असे आदेश कोर्टानं दिलेत. जामीन मिळणं हा नियम आहे आणि जेल हा अपवाद आहे. असं मत सुप्रीम कोर्टानं टू जी घोटाळ्यातल्या आरोपींना जामीन देताना नोंदवलं होतं. कलमाडींना जामीन मंजूर करताना कोर्टानं त्याचाच दाखला दिलाय.
First Published: Thursday, January 19, 2012, 20:44