Last Updated: Saturday, February 4, 2012, 07:21
योगेश खरे, www.24taas.com, नाशिक नाशिक महापालिका निवडणुकीच्या मैदानात अनेक कोट्यधीश उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्या आशा सानप यांच्याकडे तब्बल दीड किलो सोनं आहे. तर सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराचा मान मिळाला आहे काँग्रेसच्या उद्धव निमसेंना.
नाशिकच्या पंचवटी भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या आशा सानप यांनी सध्या दागिने कमी घातले असले तरी त्यांच्याकडे तब्बल दीड किलो सोनं आहे. तर त्यांची मालमत्ता आहे तीन कोटी ४१ लाखांची. असं असताना त्यांच्याकडे एकही वाहन नाही आणि कर्जही नाही
नाशिकमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठेरलेत ते काँग्रेसचे उद्धव निमसे. त्यांची मालमत्ता आहे तीस कोटींची. बांधकाम व्यवसाय आणि द्राक्षशेती असल्यानं पिढीजात श्रीमंत असल्याचा त्यांचा दावा आहे. या दोघांबरोबरच नंदू जाधव, शरद जाधव, उषा बेडकोळी, शशिकांत जाधव हे आणखी काही श्रीमंत उमेदवार आहेत. आता या श्रीमंत उमेदवारांना मतांचं किती दान मिळणार, हे लवकरच कळेल.
First Published: Saturday, February 4, 2012, 07:21