नाशिकमध्ये निवडणुकीला हिंसक वळण - Marathi News 24taas.com

नाशिकमध्ये निवडणुकीला हिंसक वळण


मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
 
नाशिक पालिका निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच्या अर्जावर हरकत घेणाऱ्या शिवसेना उमेदवाराला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 
शिवसेना उमेदवार प्रवीण लिदमे यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजी चुंभळेंच्या अर्जावर दोन आक्षेप घेतले होते. मात्र पुराव्याअभावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या फेटाळले. मात्र याचा मनात राग धरून शिवसेना उमेदवार आणि त्यांच्या मोठ्या भावाला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
 
प्रवीण लिदमेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवाजी चुंभळेंसह चौघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तसंच एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. गृहखातं सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. परिणामी पोलिसांसमोर शांतता ठेवण्याचं खडतर आव्हान असल्याचं स्पष्ट झालं आहे.

First Published: Saturday, February 4, 2012, 22:56


comments powered by Disqus