Last Updated: Thursday, February 9, 2012, 10:52
www.zee24taas.com, नाशिक नाशिकमध्ये वाहनांचं जळीतकांड ताजं असतानाचं आता राजकीय पक्षांची उमेदवारांची प्रचार कार्यालयंही टार्गेट होऊ लागली आहेत. नाशिकच्या पवननगर भागात मनसेचं प्रचार कार्यालय जाळण्यात आलं आहे.
मनसेच्या उमेदवार ज्योती शिंदे आणि मुकेश शहाणे यांचे प्रचार कार्यालय आहे. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या जळीतकांडाचं प्रमाण नाशिकमध्ये वाढले आहे. नाशिकमध्ये मोटर बाईक्स जाळल्या गेल्या होत्या. तसेच द्वारका चौकात मिनी ट्रक्स, मॅक्सी कॅब्सचंही दहन केलं गेलं होतं.
नाशिककरांमध्ये निवडणुकाच्या तोंडावर दहशत पसरवण्यासाठी समाजकंटकांनी हे जळीतकांड सुरू केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकमध्ये मनसेचा प्रभाव वाढत असल्यामुळे विरोधकांनीच तर हा प्रकार केला नसेल ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 10:52