Last Updated: Thursday, February 9, 2012, 14:22
योगेश खरे,www.24taas.com, नाशिक नाशिकचं हे देवळाली लष्करी प्रशिक्षणार्थी केंद्रात काही प्रशिक्षण घेणारे तर काही सैनिक राहतात. याच ठिकाणी प्रभाग क्रमांक ५४चं मतदान केंद्र उभारलं जात आहे. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत. या भागात कसं काम करायचं असा निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनाही प्रश्न पडला आहे.
पंचवटी परिसरातही उमेदवाराच्या खाजगी संस्थेत मतदान केंद्र ठेवल्यानं काही उमेदवार संतप्त झाले आहेत. या शिवाय मतदार याद्यांबाबतही अनेक तक्रारी आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळवू असं महापालिका आयुक्त सांगत आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच उमेदवार वेगवेगळे फंडे वापरत असतात. त्यात काही बेकायदेशीर असतील तर त्याला निवडणूक आयोगानं वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 14:22