Last Updated: Thursday, February 9, 2012, 21:27
www.24taas.com, पुणे 
महिला आरक्षणानंतर आपल्याच घरात सत्ता रहावी म्हणून पत्नी आणि मुलांना तिकीट मिळवून देणारे अनेक जण. पण पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीलाच उमेदवारी मिळवून दिली आहे. सचिन चिखले आणि अश्विनी मराठे या दोघं प्रियकर आणि प्रेयसी आहेत.
या जोडगोळीच्या प्रेमाची सध्या बरीच चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. यमुनानगर प्रभागातून अश्विनी ही मनसेची उमेदवार आहे. खरं तर या वॉर्डातून अश्विनीचा प्रियकर सचिन चिखलेला उमेदवारी मिळणार होती, पण हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे सचिननं त्याची प्रेयसी अश्विनीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
पण त्यामुळे दोघांनाही त्यांचं लग्न पुढे ढकलावं लागलं आहे. आता निवडणुकीत जिंकल्यावरच आणि तेही राज ठाकरेंच्या साक्षीनं बोहल्यावर चढण्याची दोघांची इच्छा आहे. त्यामुळे आधी लगीन निवडणुकीचं म्हणत दोघांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 21:27