आदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार' - Marathi News 24taas.com

आदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार'

www.24taas.com, नाशिक
 
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच प्रचारसभेत गुंतलेले आहे. मुंबई, पुणे नंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असल्याने तरूणांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे.
 
नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंनी कॉलेज रोड परिसरात रोड शो केला. त्याचबरोबर कॅफेमध्ये कॉफी घेताना आदित्यनं विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. गैरकारभार सुधारण्यासाठी मुंबई विद्यापीठात असलेली एसएमएस सेवा पुणे आणि नाशिकमध्येही सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
 
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. त्यासाठीच कॉलेज रोड परिसरात आदित्य ठाकरेंनी जोरदार रोड शो केला. आता रोड शो केल्याने नाशिकचे सुज्ञ मतदार कोणाच्या पारड्यात त्यांची मतं टाकणार हे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 
 

First Published: Monday, February 13, 2012, 14:45


comments powered by Disqus