राज ठाकरे स्वत: गुंडगिरी करतात - भुजबळ - Marathi News 24taas.com

राज ठाकरे स्वत: गुंडगिरी करतात - भुजबळ

www.24taas.com, नाशिक
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिकच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी टीका केली, त्याच सोबत भुजबळांच्या घराणेशाहीवर देखील टीका केली. त्यामुळे आज अपेक्षेप्रमाणे भुजबळांनी टीका केली. मात्र ही टीका केली ती खासदार समीर भुजबळ यांनी. समीर भुजबळ यांनी राज यांच्या आरोपाचे खंडन करत, राज यांनाच दोषी ठरवले.
 
नाशिकच्या सभेत छगन भुजबळांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंवर नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे स्वत: गुंडगिरी करतात, तोडफोड करतात, आणि आमच्या नावानं बोंबा मारतात, असा पलटवार त्यांनी राज यांच्यावर केला आहे.
 
नागरिक भूलथापांना बळी पडणार नाही, असंही समीर भुजबळ म्हाणाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही राज यांच्यावर टीका केली आहे. विकासाच्या मुद्द्यापेक्षा राज यांच्या भाषणात नकलाच जास्त असतात असा आरोप माणिकरावांनी केला आहे. आज राज ठाकरे यांची मुंबईत सभा असल्याने ते पुन्हा एकदा सगळ्यांचा समाचार घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

 
 

First Published: Monday, February 13, 2012, 19:19


comments powered by Disqus