प्रचाराची नवी मोहीम 'अंधांच्या हाती' - Marathi News 24taas.com

प्रचाराची नवी मोहीम 'अंधांच्या हाती'

www.24taas.com, पुणे
 
महापालिका निवडणुकांसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. राजकीय पक्षांनी धडाक्यात प्रचार करुन आपल्यालाच मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे.  मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मात्र मतदारराजा मतदानासाठी घराबाहेर पडत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यात एका अनोख्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
महापालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. यांत महाविद्यालयीन तरुण तरुणींसह अंध युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मतदान करणं हा हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे असं आवाहन या युवकांनी या रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना केलं आहे.
 
त्यामुळे आचारसंहिता जरी सुरू असली तरी आता मतदारांना जागरूक करण्यासाठी राजकीय पक्ष हे या 'अंधांचा आधार' घेत आहेत. कोणत्याही पक्षाचा प्रचार जरी केला जात नसला तरी सुद्धा अंधांच्या या रॅलीमुळे मतदारांना मतदानासाठी जागरूक करण्याचा हा प्रयत्न मात्र म्हणजे कायद्यातून पळवाट काढण्यासारखचं आहे.
 
 
 

First Published: Wednesday, February 15, 2012, 16:09


comments powered by Disqus