Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:38
www.24taas.com, पुणे पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत. अविनाश बागवे हे मतदान केंद्राजवळ १०० मीटरच्या आत प्रचार करत करत होते. त्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढले, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
दरम्यान, नाशिकमधील प्रभाग क्र. १४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांना मनसैनिकांनी मारहाण केली असून घराची आणि कार्यालयाचीही तोडफोड केल्याचा आरोप टिळे यांच्या समर्थकांनी केला आहे.
पुण्यामध्ये सकाळपासून १३ टक्के व्होटिंग झाले आहे.
First Published: Thursday, February 16, 2012, 13:38