Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:51
www.24taas.com, कैलाश पुरी, पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडच्या सांगवीतल्या जनतेला प्रशांत शितोळे आणि हर्शल ढोरे यांच्यातला वाद नवीन नाही. निवडणुकीपूर्वी दोन्ही गटात झालेल्या वादात तुषार ढोरेची हत्या झाली होती. त्यानंतर प्रशांत शितोळेंना अटकही झाली होती.
पण तरीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यात शितोळे यशस्वी ठरले. त्यानंतर हर्शल ढोरेंनी बंडखोरी करून शितोळेंविरोधात निवडणूक लढवली. मात्र अटतटीच्या लढतीत ढोरेंना निसटता पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काल दोन्ही गटांतला वाद पुन्हा एकदा उफाळून आला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
शितोळे-ढोरे गटातल्या वादामुळे सांगवी परिसरात तणावाचं वातावरण आहे. दोन्ही गटांमधला कमालीचा द्वेष पाहता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीत हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा पिंपरी-चिंचवडचं राजकारण रक्तरंजीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
First Published: Sunday, February 19, 2012, 17:51