Last Updated: Tuesday, February 21, 2012, 19:46
www.24taas.com, नाशिक
नाशिक महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेवरून भाजपमध्ये मतभिन्नता दिसून येतेय. मनसेसोबत नवा नाशिक पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेसह सत्ता स्थापण्यासाठी एक गट अनुकूल असला तरी शिवसेनेला डावलून मनसेसोबत सत्तास्थापन करण्यास एका गटानं विरोध केलाय.
त्यामुळे भाजप-मनसे मैत्री होऊन नाशिकमध्ये नवा पॅटर्न सत्तेत येतो का ?याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सध्या नाशिक महापालिकेत ४० जागा मिळवून मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे आता त्याला सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि अपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे.
त्यामुळे मनसेशी युती करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नांना वेग आला असताना जुना मित्र असलेल्या शिवसेनेशी दगा फटका करण्यात येऊ नये, असा सूर भाजपमधून येत आहे. त्यामुळे या नव्या नाशिक पॅटर्नला भाजपमधून विरोध होत आहेत.
First Published: Tuesday, February 21, 2012, 19:46