महापौरांची खुर्ची की, संगीतखुर्ची? - Marathi News 24taas.com

महापौरांची खुर्ची की, संगीतखुर्ची?

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात महापौरपदाची संगीतखुर्ची रंगण्याची शक्यता आहे. शहराचं महापौरपद ४ जणींना सव्वा-सव्वा वर्षांसाठी विभागून देण्याचा विचार पक्षातर्फे होऊ शकतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पुणेकरांना मात्र हा निर्णय मान्य नाही. त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
पुण्यात राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवलं असलं तरी आता समस्या आहे ती, महापौरपदाच्या खुर्चीचा. म्हणजेच आता महापौरपदाच्या खुर्चीत नक्की किती जण विराजमान होणार आहे. होय.. कितीजणच कारण की, पाच वर्षाच्या काळात राष्ट्रवादी पुण्याला ४-४ महापौर देण्याचा विचार करीत आहे.
 
कारण की, तेथील काही पक्षातील ज्येष्ठ असल्याने प्रत्येकाला महापौर बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापौरपदाची खुर्ची ही संगीतखुर्ची आहे का? असा प्रश्नच पुणेकरांना पडला आहे.
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 20:19


comments powered by Disqus