Last Updated: Saturday, March 10, 2012, 15:22
www.24taas.com, नाशिक
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या नगरसेवकांची काळजी घेताना दिसत आहेत. शिवसेनेचे नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
शिवसेना नगरसेवकांबरोबर भाजपचे नगरसेवकही अज्ञातस्थळी जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते देत होते. परंतु भाजपनं ऐनवेळी आपल्या नगरसेवकांना पाठवलं नाही. आज होणाऱ्या शिवजयंतीचं कारण पुढं करत भाजपनं शिवसेनेसोबत जाण्यास नकार दिला. मात्र भाजपच्या या निर्णयामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथिनुसार जयंती असल्याने शिवसेनेच्या वतीनं मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईतल्या चेम्बूर सर्कल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई आणि ठाण्याचे महापौरपद जिंकल्यानंतर नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर बोलणं टाळलं आणि याबाबत लवकरच तुम्हाला समजेल असं सांगितलं.
First Published: Saturday, March 10, 2012, 15:22