Last Updated: Sunday, November 10, 2013, 08:33
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपोलिसांच्या घरासाठी एक हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधत पुण्यात पोलिस दल आणि अग्निशमन दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती आणि वनमंत्री पतंगराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम, पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ याबरोबर दोन्ही दलातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस आणि अग्निशमन दलातील उल्लेखनीय कामगिरी करणारया कर्मचाऱ्यांचा यावेळी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गीतकार आणि गायिका वैशाली सामंत, गायक स्वप्निल बांदोडकर, अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी यावेळी कर्मचार्यांसाठी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, November 10, 2013, 08:19