Last Updated: Saturday, October 13, 2012, 11:28
www.24taas.com, सोलापूर तेरा महिन्याच्या एका चिमुरडीवर १९ वर्षीय नराधमानं बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मुलींवर दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. वासनेच्या आहारी जाऊन फक्त तेरा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून माणुसकीला काळीमा फासला आहे. ही घटना सोलापुरात घडली आहे.
अवघ्या तेरा महिन्याच्या मुलीवर एका १९ वर्षीय नराधमानं बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
हा क्रूरकर्मा शेजारीच राहत होता. त्याने मुलीली खेळवायला घेऊन जातो, असं सांगून तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार केला. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
First Published: Saturday, October 13, 2012, 11:22