Last Updated: Wednesday, December 25, 2013, 20:14
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्याच्या उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या परिसरात एकाच दिवशी दिवसा ढवळ्या १८ घरफोड्या झाल्यायत.
पुण्यातला वाकड परिसर हा तसा सुरक्षित समजला जातो. पण चोरट्यांनी हा समज खोटा ठरवलाय. वाकडमध्ये एकाच दिवशी मॅक्सिमा वसाहतीत तेरा ठिकाणी, कासापल्लीमध्ये २ आणि तर आईसलँड वसाहतीत ३ ठिकाणी घरफोड्या झाल्यात. या घरफोड्यांमध्ये ८५ तोळे सोनं आणि रोकड मिळून १९ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. या १८ घरफोड्या दिवसाढवळ्या आणि तेही अवघ्या अडीच तासांमध्ये झाल्या.
दुसरीकडे पोलिसांनी या चोऱ्यांचा लवकरच शोध लावू असा दावा केलाय. चोर कामगारांच्या वेशात गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दिवसा ढवळ्या झालेल्या या चोऱ्यांमुळे पुणेकरांची झोप उडालीय. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 25, 2013, 20:14