Last Updated: Thursday, October 24, 2013, 22:41
www.24taas.com, झी मीडिया, पुणे शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्याबद्दल पुण्यातील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’ला चांगलाच फटका बसलाय. शिक्षण विभागाने ही कारवाई केलीय.
‘दिल्ली पब्लिक स्कूल’मधील गरीब विद्यार्थ्यांना परस्पर दुसऱ्या शाळेत दाखल करण्यात येत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यासंबंधीची तक्रार ‘शिक्षण हक्क मंचा’ने केली होती. त्यावर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ‘कॅपिटेशन फी’ वसूल करण्यात येत असल्याचा प्रकारही समोर आला. त्याबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘दिल्ली पब्लिक स्कूल’वर दंड वसुलीच्या कारवाईची शिफारस करण्यात आली. यानुसार या शाळेला तब्बल २२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे... त्यामुळे दिल्ली पब्लिक स्कूलचे धाबे दणाणलेत.
शाळेने विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या फीच्या दहापट दंडाची तरतूद शिक्षण हक्क कायद्यामध्ये आहे. त्यानुसार कारवाही करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कारवाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण हक्क मंचाने केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 24, 2013, 22:41